— वेगाव येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क: मारेगांव.
वेगाव येथील एका २५ वर्षीय वर्षीय युवकाने आजारातून आलेल्या नैराश्यामुळे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ता.१७ मे रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान उघडकीस आली.
दिपक भास्कर रामटेके(२५) हे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन ते कुंटुबासह वास्तव्यास होते. दरम्यान ता. १६ मे रोजी दीपक सकाळी १० च्या सुमारास बाहेर जातो असे सांगत घराबाहेर निघून गेला. परंतू दिवसभर परत आला नसल्याने वेगाव परिसरात नागरिक तथा कुटुबियांनी शोध घेतला परंतु दीपक मिळाला नाही.
मात्र ता. १७ मे रोजी सकाळी ७ वाजता वेगाव शिवारातील शेतात कामाला जाणाऱ्यांना ऊमरीच्या झाडाल दीपक गळफास घेऊन लटकलेला आढळला. दीपक हा बऱ्याच दिवसापासुन आजारी असुन त्यांच्यावर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून दीपक यांनी आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.
