— तालुक्यात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा,व गारांसह पाऊस
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आकापुर येथे ता. २२ एप्रिल राेज सोमवारला सायंकाळी ५:३० वाजेदरम्यान अचानकच सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट व गारांसह पाऊस कोसळत असतांनाच आकापुर शिवारात वीज कोसळून एका शेतकर्याचा बैल जागीच ठार झाला. ऐन उन्हाळी मशागतीच्या हंगामात बैल ठार झाल्याने शेती कशी करावी ही विवंचना शेतकऱ्यासमोर उभी असल्याने शासनाकडुन आर्थिक मदत मिळावी अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे.
मागील पाच सहा वर्षापासुन तालुक्यातील शेतकरी निसर्गाचा असमतोल पणाचा अनुभव घेत आहे.निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकल्याने शेतकरी हवालदिल झाला असतानाच या वर्षी तर चक्क निसर्गाचा कहर अनुभवने सुरु आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसी ३० मार्च ला चक्रीवादळ सदृश्य सोसाट्याचा वारा, गार व पाऊस झाल्याने तालुक्याच्या अंतीम टोकावर वसलेल्या गावांना फटका बसुन घरांची पडझड सुध्दा झाली होती.
दरम्यान ता २२ एप्रिलला सायंकाळी ५:३० वाजेदरम्यान अकस्मात सोसाट्याचा वारा, आभाळात विजांचा कडकडाट, व मेघगर्जना, व गारांसह पावसाला जोरात सुरुवात झाली. याच वेळी आकापुर शिवारात नारायण खंडाळकर यांचे बैल सुध्दा शेतात चरण्यासाठी सोडले होते. परंतु याच वेळी एका बैलाच्या अंगावर वीज कोसळली व बैल जागीच ठार झाला. बैल जागीच ठार झाल्याने मात्र शेतकरी परत आर्थिक खाईत ढकलला गेला. त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
