– तालुक्यात अतीवृष्टीमुळे कापुस पिकाचे नुकसान
– कृ.उ.बा.स.संचालक मंडळाची प्रशासनास निवेदनातून आर्जव
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात सोयबीन पीक काही भागात फुलोऱ्यात; तर काही भागात शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.मात्र,या पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस आल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.तसेच अतीवृष्टीमुळे कापूस पिकाचेही मोठे नुकसान झाले असून यावर आमसभे द्वारे चर्चा करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव कृ.उ.बा.स.संचालक मंडळाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
तालुक्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांनी पुरता डबघााईस आला आहे. गेल्या तीन वर्षापासून तालुक्यातील काही भाग पुरबुडाईमुळे उध्वस्त झाला असताना या वर्षीही तालुक्यात अतिवृष्टीने कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.यातच सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाने आक्रमण केल्याने सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान झाले असून याचा वेळीच बंदोबस्त न केल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान येलो मोझॅक व्हायरस मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे झालेले नुकसान याबाबत मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमसभा घेऊन झालेल्या नुकसानीची सविस्तर चर्चा करण्यात यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा यांचेसह मारोती गौरकार, कृ.उ.बा.स.संचालक काशिनाथ खडसे, रमन डोये, प्रफुल विखनकर, संतोष मडावी, यादव काळे, भास्कर धांदे, अविनाश लांबट, जीवन काळे, विजय अवताडे, महादेव सारवे, विलास वासाडे, तुळशीराम कुमरे, डिमनताई टोंगे, गोवर्धन टोंगे, यांचेसह शेतकरी उपस्थित होते.




