– वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील वास्तव
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहराच्या मध्यातून जाणारा वणी- यवतमाळ राज्य महामार्ग नेहमीच चर्चेत असतो.या महामार्गावरील वाढलेली झुडपे, महामार्गावर पडून असलेले खांब व राज्य महामार्गावरील दुभाजकाला नसलेले लाईट असे त्रिकूट मिळून अपघातास निमंत्रण देत असल्याचे विदारक वास्तव आहे.
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर वाहनांची नेहमीच प्रचंड वर्दळ असते.सद्यस्थितीत शहराच्या मध्यातून जाणाऱ्या या महामार्गास एका वेगळ्याच समस्येने विळखा घातला आहे.
शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला वाढलेली झुडपे,रस्ता दुभाजक सुरू होते त्या ठिकाणी नसलेले लाईट व शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या करणवाडी नजीक रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून पडून असलेले खांब भविष्यात होणाऱ्या एखाद्या भीषण अपघाताचे साक्षीदार बनण्याची वाट बघत उभे आहे.
गत कित्येक दिवसापासून अपघातास निमंत्रण देणारे अपघात प्रवन ‘त्रिकूट’ ‘कुणाच्याही’ निदर्शनात येत नसल्याने सदर महामार्गावरून आवागमन करणाऱ्या नागरिक व प्रवाशांतुन कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे.




