– राजुर रिंग रोड येथील घटना
– मारेगाव तालुक्यातील धामणी येथील युवक गंभीर जखमी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील धामणी येथील युवक वणी येथे काही कामानिमित्त जात असता राजुर रिंग रोड नजीक एका भरधाव ट्रकने युवकाच्या दुचाकीस मागून जबर धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.युवकास वणी येथील रुग्णालयात हलविल्याची माहिती आहे.
ओम विलास भडके (२३) रा.धामणी असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान १३ सप्टेंबर रोजी सकाळी ओम काही कामानिमित्त वणी येथे जात असता राजुर रिंग रोड नजीक एका भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीस मागून जबर धडक दिली.यात ओमच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
रस्त्यावरून ये जा करणाऱ्या काही नागरिकांनी ओम यास वणी येथील रुग्णालयात दाखल केले असून वृत्त लिहीपर्यंत पुढील माहिती प्राप्त होऊ शकली नाही.




