— पांढरकवडा (पिसगाव)येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव)येथील एका ३२ वर्षीय विवाहित शेतकऱ्याने राहते घरी विषारी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविल्याची घटना ता. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान घडली.
आशिष दिगंबर आस्वले असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असुन कुटुंबासह मृतक आशिष पांढरकवडा (पिसगाव)येथे वास्तव्यास होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असुन, त्यांचे नावे एक हेक्टर शेती आहे. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असून जून महिन्यातच मृतकाचा विवाह झाला होता.
दरम्यान ता. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान आशिष यांनी स्वतःचे घरीच मोनोसिल नामक विषारी कीटकनाशक प्राशन करुन मृतकानेच विष प्राशन केल्यानंतर फोनवरून विष प्राशन केल्याची माहीती शेतात असलेल्या नातेवाईकांना कळविली. मात्र गावातील नागरीकांना ही माहीती मिळताच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतू तब्येत खालावल्याने त्याना वणी येथे रेफर करण्यात आले. मात्र मारेगाव वणी जाताना वाटेतच गौराळा नजीक त्यांचा मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास पोलीस जमादार आनंद अलचेवार करीत आहे.
