— श्री परमहंस शैक्षणिक व संशोधन संस्था, दिल्ली द्वारे घोषीत
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री परमहंस शैक्षणिक व संशोधन संस्था, दिल्ली द्वारा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे.
दिल्ली येथील नामांकित श्री.परमहंस शैक्षणिक व संशोधन संस्था द्वारा विद्यार्थी व शिक्षक यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले योगदान,शैक्षणिक गुणवत्ता, व्यावसायिकता, संशोधन नवकल्पना आणि महाविद्यालय व्यवस्थापन इत्यादी सेवांची गुणवत्ता आणि योगदान या निकषाच्या आधारे हा पुरस्कार देण्यात येत असुन मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायचे प्राचार्य डाॅ.अविनाश घरडे यांच्या कार्याची दखल घेत घरडे यांना हा पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे.
श्री परमहंस शैक्षणिक व संशोधन संस्था, दिल्ली द्वारा मिळणारा पुरस्कार आदीवासी बहुल तालुक्यातील मारेगांव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायचे प्राचार्य डाॅ. अविनाश घरडे यांना मिळाल्याने तालुक्याची मान उंचावली असून प्राचार्य डॉ. घरडे यांना पुरस्कार जाहीर होताच शेतकरी शिक्षण संस्था, मारेगाव व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.




