लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगांव
काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी मारेगांव येथील शकिल अहमद शरीफ अहमद यांची ता.१५ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत, माजी आमदार वामन कासावार यांच्या हस्ते, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष मारोती गौरकार यांनी, जेष्ठ नेते, नरेंद्र पाटील ठाकरे, नानाजी पाटील खंडाळकर, माजी सभापती अरुणाताई खंडाळकर, कृ.उ.बा. समिती सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
मारेगाव तालूका हा नेहमीच काँग्रेस विचार सरनीचा राहीला असून यापुढेही तालुक्यात काँग्रेसला बळकटी देण्यासाठी व युवकांना प्राधान्य देत शरीफ अहेमद यांची नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आकाश बदकी, यादवराव काळे, खालिद पटेल, उदय रायपुरे, प्रफुल विखनकर, बंडू चंदनखेडे, रवी धानोरकर,अंकुश माफूर, तुळशीराम कुमरे, समीर सय्यद, शैलेश आत्राम, मायाताई घाडगे, शकुंतला वैद्य, मायाताई पेंदोर, तोडासे ताई, शाहरुख शेख,समिर कुडमथे उपस्थित होते.




