— माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
मारेगांव येथे सीसीआय कापूस केंद्र सुरु व्हावे यासाठी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांची कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमण डोये, अविनाश लांबट, तथा तालूका भाजपा सरचिटणीस प्रशांत नादे यांनी ता.२ डिसेंबर रोजी भेट घेत साकडे घालत निवेदन दिले. माजी आमदार बोदकुरवार यांनी लगेच वरिष्ठ पातळीवर भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून लवकरच मारेगाव येथे सीसीआय कापूस खरेदी सुरू होईल असे आश्वासीत केले.
मारेगाव तालूका हा शेतीप्रधान असून कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून शेतकरी आपला कापूस पडत्या दरात देत असल्याने मारेगाव कृ.उ.बा.समिती संचालक रमण डोये, अविनाश लांबट, ता. भाजपा सरचिटणीस सरचिटणीस प्रशांत नांदे यांनी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांची त्यांच्या निवासस्थानी ता. २ डिसेंबर रोजी निवेदन देत तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने साकडे घातले. माजी आमदार बोदकुरवार यांनी लगेच देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार तसेच सी. सी. आय. चे एम डी ललित कुमार गुप्ता मुंबई यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून येत्या काही दिवसातच मारेगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले.




