– तालुक्यातील सालेभट्टी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथील एका २३ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुःखद घटना गुरुवारी रात्री २ वाजे दरम्यान घडली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राहुल भीमा आत्राम (२३) रा. सालेभट्टी असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.राहुल रोजमजुरी करून आपल्या कुटुंबास आर्थिक हातभार लावत होते.
दरम्यान २१ ऑक्टोंबर रोजी राहुल यांनी सालेभट्टी येथील स्वतःचे राहते घरी विष प्राशन केले होते. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी राहुल यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले.
चंद्रपूर येथील रुग्णालयात पाच दिवस मृत्यूची झुंज दिल्यानंतर अखेर राहुल यांची प्राणज्योत गुरुवारी मध्यरात्री २ वाजेदरम्यान मालवली.या दुःखद घटनेने सालेभट्टी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक राहुल यांचे पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे.
