– ४ लाख रुपयाचा धनादेश कुटुंबाच्या सुपूर्द
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शेतकाम आटोपुन घरी परत येत असताना चालत्या बैलबंडीवर वीज कोसळुन गोरज येथील महिला ठार झाल्याचे दुःखद घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी गोरज शिवारात घडली होती.परिणामी शासन मदत म्हणून १४ सप्टेंबर रोजी विद्यमान आमदारांनी मृत महिलेच्या कुटुंबास ४ लाखाचा जनादेश सुपुर्द केला.
सुवर्णा संजय कांबळे (३५) असे चालत्या बैलबांडीवर वीज कोसळून ठार झालेल्या महिलेचे नाव होते.त्या आपल्या पती व मजुरासह शेतात गेल्या होत्या. दुपारी स्वगृही परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या बैलबंडीवर वीज कोसळली. यात सुवर्णा या जागीच गतप्राण झाल्या होत्या.
दरम्यान १४ सप्टेंबर रोजी विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी मृतक महिलेच्या कुटुंबीयांस शासन मदत म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करून कांबळे कुटुंबीयांच्या दुःखावर पांघरून घालण्याचा छोटासा प्रयत्न केला.
यावेळी विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, तहसीलदार यु.एस.निलावाड यांचेसह मृतक सुवर्णा यांचे पती संजय कांबळे, कुटुंबीय तसेच गोरज येथील नागरिक उपस्थित होते.





