– दहीहंडी स्पर्धा : लहान-थोरांचा उत्स्फूर्त सहभाग
– प्रभाग क्रमांक १० येथे आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
अवघ्या महाराष्ट्रात गोकुळाष्टमी साजरी होत असताना ता.७ सप्टेंबर रोजी मारेगावात प्रभाग क्रमांक १० येथे जन्माष्टमी निमित्त दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात विजेता ठरलेल्या गोविंदाने ‘हजारोचे बक्षीस रुपी दही’ चाखले असून लहाना-थोरांनी या दहीहंडी स्पर्धेत मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला.
जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी.दहीहंडी वेळी एक मानवी पिरॅमिड तयार करून वरती दही हंडी म्हणून दह्याने भरलेले मातीचे भांडे हवेत लटकवले जाते.हे दह्याने भरलेले मातीचे भांडे फोडण्यास स्पर्धकांची प्रचंड झुंबड उडत असते.ही दहीहंडी फोडणाऱ्यास ‘गोविंदा’ असे म्हणतात.
जन्माष्टमीनिमित्त गुरुवारी अवघ्या महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असताना मारेगावातही प्रभाग क्रमांक १० येथे दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रभागातील शेकडो लहान थोरांनी मोठ्या हीरीरीने सहभाग नोंदवला.या दहीहंडी स्पर्धेत विजयी ठरलेल्या युसुफ अब्दुल शेख यांनी हजारो रुपयांचे ‘बक्षीस रुपी दही’ चाखले.
गोकुळाष्टमीनिमित्त पार पडलेल्या या दहीहंडी स्पर्धेकरिता प्रभाग क्रमांक १० येथील ‘समाजसेवा ग्रुपच्या युवकांनी’ परिश्रम घेतले.
यावेळी प्रभागातील लहान थोरांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.




