– उत्तरीय तपासणीअंती मृतदेह नातलगांचे सुपुर्द
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
२८ जुन रोजी बोटोनी येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सवंगड्याने मृत व्यक्तीचे पॉकिट, मोबाईल व दुचाकी घेऊन अपघात स्थळावरून पोबारा केल्याने मृत व्यक्तीचे नाव कळू शकले नव्हते. अखेर अपघातातील मृतकाची ओळख पटली असुन ‘त्या’ अपघातावरील पडदा उघड झाला आहे.
हिरामण भिमाजी बोचेकर (४०) रा.वाढोणा (खुर्द) ता.कळंब असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून कबीर डहारे असे घटनास्थळावरून पोबारा केलेल्या हिरामण यांचे मित्राचे नाव आहे.दोघे काही कामानिमित्त वेगाव येथे त्यांचे नातेवाईकांकडे आले होते अशी माहिती आहे.
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील बोटोंनी येथे भरधाव दुचाकी वरून तोल गेल्याने युवक रस्त्यावर पडुन मागाहून येणाऱ्या ट्रकच्या पुढील चाकात आल्याने युवकाचा पुरता चंदामेंदा झाल्याची घटना २८ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजे दरम्यान घडली होती.यावेळी सोबतच्या मित्राने घटनास्थळावरून मृत युवकाचा मोबाईल व दुचाकीसह पोबारा केल्याने मृत युवकाचे नाव कळू शकले नव्हते.
संबंधित बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…!
https://lokshashtr.in/accident-a-youth-fell-from-a-two-wheeler-and-was-hit-by-a-truck-killed/
अपघातानंतर मृत हिरामण यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.उत्तरीय तपासणीअंती ता . २९ जुन रोजी मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.
मृत हिरामण यांचे पश्चात पश्चात पत्नी, दोन मुली ,एक मुलगा असा परिवार असल्याची माहिती आहे.
