— मारेगाव येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव येथील एका ५५ वर्षीय इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजेदरम्यान उघडकीस आली.
स्थानिक प्रभाग क्रमांक एक मध्ये वास्तव्यास असलेले विजय नामदेव काळे (५५) असे विहिरीत उडी घेवून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असुन मृतक विजय मागील सहा सात महिण्यापासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांची सामाईक क्षेत्रात शेती असुन मागील पाच सहा वर्षापासुन होत असलेल्या नापिकीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करुन उपचार करणे शक्य होऊ शकले नाही. तरीही त्यांनी जमेल तसा दवाखान्यात उपचार केला. परंतु आपण उपचारासाठी पैसा उभा कसा करायचा ह्या विचाराने त्यांची मानसिकता ढासळली.
अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेत ता. २३ रोज मंगळवार ला रात्री मारेगाव शिवारातील ठाकूर यांचे शेतातील विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना रात्री आठ वाजता उघडकीस आली. मृतक विजय काळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात आनंद अलचेवार करीत आहेत.
