– शेतातील गोठ्यात आढळला मृतदेह
– मारेगाव तालुक्यातील जळका (पोड) येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील जळका (पोड) येथील एका ३८ वर्षीय विवाहित युवकाने शेतातील गोठ्यात विषाचा घोट घेत आत्महत्या केल्याची दुःखद घटना गुरुवारी सकाळी जळका शिवारात उघडकीस आली.
किसन सोमा कासार (३८) रा.जळका (पोड) असे विषाचा घोट घेत आत्महत्या केलेल्या ३८ वर्षीय विवाहित युवकाचे नाव आहे.ते शेतमजूर होते.
दरम्यान बुधवारी सायंकाळी किसन हे जागली साठी शेतात गेले होते.परंतु सकाळी उशिरापर्यंत ते घरी परत आले नाही.परिणामी गुरुवारी सकाळी किसन यांचे आईने शेतात जाऊन पाहणी केली असता किसन यांचा मृतदेह शेतातील गोठ्यात आढळून आला.
वृत्त लिहीपर्यंत मृत किसन यांच्या आत्महत्येचे कारण कळु शकले नव्हते.त्यांचे पश्चात आई,पत्नी,दोन मुले,भाऊ असा परिवार असल्याची माहिती आहे.
