— मांगरुळ येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव….
मांगरुळ येथील एका ३६ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दुपारी २.३० वाजेदरम्यान उघडकीस आली.
मांगरुळ येथे वास्तव्यास असलेले गोपाल मधुकर ठाकरे (३६)असे विहिरीत उडी घेवून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असुन मृतक हे गवंडी कामगार असल्याची माहीती आहे
दरम्यान ता. २१ डिसेंबर रोजी गोपाल रात्री घरुन निघून गेल्याची माहीती आहे. त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध केली. मात्र गावाजवळ असलेल्या शेतातील विहीरीत ता. २२ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेदरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहीती मिळताच पोलीस दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतक गोपाल यांच्या मागे आई, वडील, पत्नी ,मुलगी व चार विवाहित बहिणी असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहिस्तोवर मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांचे मार्गर्शनात ए. एस. आय. किसन सुंकुरवार करीत आहे.




