— वरुड येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
वरुड येथील एका ३५ वर्षीय विवाहित तरुणाचा शेतात विद्युत प्रवाहाचा धक्का लागुन मृत्यु झाल्याची घटना ता. २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान उघडकीस आली.
सतीश अशोक मंदे(३५) असे मृतक विवाहित तरुणाचे नाव असुन तालुक्यातील वरुड येथे वास्तव्यास होते. मृतकाच्या आईच्या नावे चार एकर शेती असुन वडील वा भाऊ नसल्याने कुटुंबाची व शेतीची जबाबदारी मृतकावरच होती. दरम्यान ता. २१ जुलै रोजी दुपारी १.३० वाजेदरम्यान सतीश हे शेतात कपासीचे पिक असल्याने पिकाला फवारणी करण्या करिता घरुन शेतात गेले. परंतू सायंकाळी ५ वाजेपर्यंत मृतक फवारणी करून घरी परतले नाही.त्यामुळे आई शेतात गेली असता सतीश हे शेतात असलेल्या बोरवेल जवळील अर्थींगच्या तारा जवळ पडून दिसले. म्हणून आई हात लावायला गेली असता आईला सुध्दा विद्युत धक्का लागुन आई सुध्दा पडल्याचे तक्रारीत नमुद आहे.
आईने फोन केल्यानंतर गावातील नातेवाईक शेतात आले. व लगेच मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सतिश च्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी तथा आप्तपरिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात जमादार अफजल पठाण करीत आहे.
कुटुंबाचा आधारवड हरपला
एक दिड वर्षापुर्वी मृतकाचे वडील मरण पावल्यानंतर व सतीश हे आईवडीलांना एकटेच असल्याने आईच्या नावे असलेल्या शेतीची व कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत होते. मात्र अचानकच आता कुटुंबाचा आधारवड हरपल्याने, शेती व कुटुंबाची जबाबदारी कशी पेलायची हा प्रश्न कुटुबाला सतावत आहे.
