
– दोन महीन्या आधी अपघात…
– सावंगी (मेघे) रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव येथील हेमंत प्रभाकर पुरी (२८) हा युवक दोन महिन्या आधी झालेल्या एका अपघातात गंभीर जखमी झाला होता.तो गेल्या दोन महिन्यापासून सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मृत्यूशी कडवी झुंज देत असता अखेर २३ मार्च रोजी पहाटे नियतीने डाव साधला आणि तब्बल दोन महिन्यापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.
मारेगाव येथे वास्तव्यास असलेला हेमंत हा प्रभाकर पुरी यांचा मुलगा.दीड वर्षा आधीच लग्न झालेल्या हेमंतच्या सुखी संसारात आठ महिन्या आधी मुलीच्या रुपात कळी फुलली.हसत-खेळत असलेला हेमंत असा अवेळी काळाच्या पडद्याआड गेल्याने पुरी परिवारावर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला असून हेमंतच्या पश्चात अवघ्या आठ महीण्याची मुलगी,पत्नी,आई वडील,बहीण असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
आज दुपारी मारेगाव येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.