
– स्थानिक कला वाणिज्य व फार्मसी महाविद्यालयात आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
दिवसेंदिवस महिला व युवतींवर होणारे अत्याचार लक्षात घेता २१ ऑगस्ट रोजी स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच फार्मसी महाविद्यालयात यवतमाळ जिल्हा पोलीस दलामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे यांचे पुढाकाराने ‘युवती मार्गदर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनीं उपस्थित होत्या.
दिवसेंदिवस महिला व युवतींच्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांत प्रचंड वाढ होत आहे. परिणामी महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण ही काळाची गरज होऊन बसली आहे.
दरम्यान २१ ऑगस्ट रोजी स्थानिक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात व फार्मसी महाविद्यालयात यवतमाळ जिल्हा पोलीस दलामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे यांचे पुढाकाराने ‘युवती मार्गदर्शन शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी,वणी गणेश किंद्रे व मिलिंद पोक्षी, चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांनी महिला करिता असलेले कल्याणकारी कायदे व मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार याबाबत मार्गदर्शन केले.तसेच मुलींच्या अडचणी समजून घेतल्या.
यावेळी आयोजक उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे, मार्गदर्शक जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट मिलिंद पोंक्षे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.