
– शिवसेनेचे (उ.बा.ठा.) जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव नगरसेवकास मारहाण प्रकरणात सत्ताधारी पक्षाने ठाणेदारांच्या उचलबांगडीची उचलून धरलेली मागणी अयोग्य आहे.परिणामी मारेगाव ठाणेदारांवर होणारी कारवाई थांबविण्यात यावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाप्रमुख संजय आवारी यांचे नेतृत्वात असंख्य शिवसैनिकांनी मारेगाव पोलिसांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.
ता.२७ ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत काही शाब्दिक वाद होऊन नगरसेवकास कथीत मारहाण प्रकरणाचा वाद चांगलाच पेटलाय. भाजप नगरसेवकास मारेगाव ठाणेदारांनी मारहाण केल्याने आमदारांनी ठाणेदारांच्या उचल बांगडीची मागणी रेटून धरली असली तरी अनेक संघटना व पक्ष ठाणेदारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याने या प्रकरणात कमालीचे औत्सुक्य निर्माण झाली आहे.
दरम्यान शिवसेनेचे (उ.बा.ठा.) मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी यांचे नेतृत्वात असंख्य शिवसैनिकांनी मारेगाव पोलिसांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत सत्ताधारी पक्षाने ठाणेदारांची आपणाकडे केलेली तक्रार खोटी असून वैयक्तिक आकसापोटी केली असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. परिणामी मारेगाव ठाणेदारांवर करण्यात येणारी कारवाई थांबविण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे (उ.बा.ठा.) मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी,मारेगाव नगराध्यक्ष डॉक्टर मनीष मस्की , युवा सेना तालुकाप्रमुख मयूर ठाकरे, सुनील गेडाम,अभय आवारी,करण किंगरे, निखाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ब्रह्मदेव जुनगरी, टुमदेव बेलेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जीवन काळे,विजय अवताडे यांचे सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.