
– शहराबाहेर रवानगी : न.प.ची मोहीम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गत काही दिवसापासून मारेगावात बेवारस कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत या भटक्या श्वानांनी शहरात प्रचंड हैदोस माजवीला होता.बेवारस कुत्री चावल्याच्या काही घटनाही मारेगावात घडल्या होत्या.परिणामी नगरपंचायतने विशेष मोहीम राबवत नागपुरातील एका टीमला भटक्या कुत्र्यांना जेरबंद करण्याचे कंत्राट दिले होते.या टीमने शहरातील शेकडो भटक्या कुत्र्यांना जेरबंद करून त्यांची शहराबाहेर रवानगी केली.
तुर्तास मारेगाव शहराला शेकडो समस्यांनी ग्रासले आहे.बस स्थानकाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच भर रस्त्यावर मोकाट जनावरांचे झुंड वाहनचालकांसह प्रवाशांची वाट अडवून धरत आहे .यात भर म्हणूनच की काय गेल्या काही दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येतही कमालीची वाढ झाल्याची बाब निदर्शनास आली होती.
या भटक्या श्वानांनी चावा घेतल्याच्या काही घटनाही मारेगाव शहरात घडल्या होत्या.परिणामी या विरोधात जनसामान्यात प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली होती.दरम्यान ता.६ ऑक्टोंबर रोजी नगरपंचायतने भटक्या कुत्र्यांना जेरबंद करण्याची विशेष मोहीम राबवली.१६०० रुपये प्रति श्वान या प्रमाणे भटक्या कुत्र्यांना जेरबंद करण्याचे कंत्राट नागपूरातील एका टीमला दीले.या टीमने शहरातील वेगवेगळ्या भागातील शेकडो भटक्या कुत्र्यांना जेरबंद केले.या भटक्या श्वानांना लस देऊन इतरत्र सोडले जाणार आहे.
तुर्तास सलग तीन दिवस चाललेल्या या ऑनफिल्ड ऑपरेशन मध्ये शहरातील तब्बल १५० पेक्षा जास्त भटके श्वान जेरबंद केले गेले असुन यापुढेही ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून कडुन प्राप्त झाली असून नागरिकांतुन याबाबत समाधान व्यक्त होत आहे.