
— वरुड शिवारातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगांव
तालुक्यातील वरुड येथे ता. १८ मे रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेदरम्यान वीज कोसळून २२ बकऱ्या जागेवरच ठार झाल्याची घटना घडली असून या बकऱ्यांची किंमत दोन लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या तालुक्यात अवकाळीचा कहर सुरु असुन विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट तीव्र स्वरूपात असल्याने उन्हाळी शेती मशागत करणारे शेतकरी तथा शेतमजूरात सतत धास्ती असते.
दरम्यान ता. १८ मे रोजी नेहमीप्रमाणे भारत तुकाराम गेडाम हे बकऱ्या घेऊन चारावयास गेले. सव्वा पाच वाजेदरम्यान बकऱ्या चारुन परत येत असतांना आकाशात जोरदार विजाचा कडकडाट सुरु झाला. वीजेच्या कडकडाटामुळे बकऱ्या लगत असलेल्या कवडू जुमनाके यांचे शेतातील झाडाजवळ थाबल्या. मात्र क्षणार्धात वीज कोसळून २२ बकऱ्या जागीच ठार झाल्या. मात्र बाजुलाच उभे असलेले भारत तुकाराम गेडाम (५६) यांना काहीही झाले नसले तरी वीजेच्या कडकडाटाने भोवळ येऊन खाली कोसळले. भारत यांना तत्काळ उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भारत तुकाराम गेडाम २० नग बकऱ्या
शंकर गोविंदा नागोसे. १
रामकृष्ण शामराव उराडे १
————–
२२ नग बकऱ्या ठार.