
– अर्जुनी येथील महिला दारु विक्री विरोधात एकवटल्या
– प्रशासनास निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गावखेड्यात अवैध दारू विक्रेत्यांनी पुरता हैदोस घातला असून दारुचा घोट घेतल्याने अनेक कुटुंबे उध्वस्त होताना दिसुन येत आहे.दरम्यान १० मे रोजी तालुक्यातील अर्जुनी येथील रणरागिणींनी अवैध दारू विक्री विरोधात ठाणेदार, पोलीस स्टेशन मारेगाव यांना निवेदन देत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
प्रशासनाने सदर निवेदनाची वेळीच दखल न घेतल्याने अखेर अर्जुनी येथील महिलांनी ता.१८ मे रोजी यवतमाळ गाठत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
तालुक्यात अवैध दारू विक्रीने उच्चांक गाठला असून अवैध दारू विक्रेते अवैध दारू विक्रीमुळे गावातील वातावरण दूषित करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवैध दारू विक्री थांबवावी यासाठी महिलांनी वेळोवेळी आंदोलने केली तरीही अवैध दारू विक्रेत्यांवर याचा काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही.
तालुक्यातील अर्जुनी येथे अवैध दारू विक्रेत्यांनी पुरता हैदोस माजविला असून येथील चरणदास रामा टेकाम व सुनील किसन आत्राम हे अवैध दारू विक्री करीत असल्याची रीतसर तक्रार निवेदनातुन करण्यात आली आहे.
१८ मे रोजी तालुक्यातील अर्जुनी येथील महिलांनी एकत्र येत अवैध दारू विक्री विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत अवैध दारू विक्रेत्यांना लगाम लाऊन त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी अनिल आत्राम, अन्नपूर्णा मडावी, अनिता आत्राम, जिजाबाई आत्राम, फुलपात्रा टेकाम, मैनाबाई मडावी यांचेसह अर्जुनी येथील शेकडो महिला उपस्थित होत्या.