
♦लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगांव
देशाचे संविधान तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय प्रदान करण्याचे हे शस्त्रच सर्वसामान्य जनतेच्या हातातुन हिसकावून घेण्याचे षडयंत्र सुरु असल्याने गोरगरीबांसाठी असलेले संविधान राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ कदापीही ते हिसकावू देणार नसुन संविधान वाचविण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ कटिबद्ध असेल व राहील असे प्रतिपादन पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सुर्यवंशी यानी ता. ५ मार्च रोजी पनवेल येथील शांतीवन येथे आयोजित राज्य पुरोगामी पत्रकार संघाच्या बैठकीत अध्यक्षीय भाषणातून केले.
आयोजित राज्य स्तरिय बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुराेगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अडांगळे, राष्ट्रीय सल्लागार सुभाष बिंदुवाल,तथा राज्याध्यक्ष संताेष जाधव हाेते. पत्रकार संघामध्ये अनेक पत्रकार बांधव हे आर्थिक दृष्ट्या सबळ नाही याची मला जाणीव असुन अशा पत्रकार बांधवांसाठी आर्थिक स्त्रोत कसा तयार करता येईल, व संघातील कोणताही पत्रकार आर्थिक दृष्ट्या सबळ करण्यासाठी येत्या काही दिवसात योजना तयार करत असल्याचे सुध्दा अभिवचन या बैठकीदरम्यान अध्यक्षीय भाषणातून दिले. दरम्यान या बैठकीत मागील पाच वर्षाचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला. संघाचा ताळेबंद समजाऊन सागण्यात आले. आगामी काळात संघ वाढवण्यासाठी काय करता येईल याची महत्वपुर्ण माहिती राज्य अध्यक्ष संताेष जाधव यांनी दिली. बैठकीत प्रत्येक विषयावर इतंभुत चर्चा करण्यात आली. या बैठकीत संघ हिताचे काही निर्णय सुध्दा घेण्यात आले. राज्यातुन आलेल्या पदाधिकाऱ्यांना संघाचे ओळखपत्र वितरित करण्यात आले.
या बैठकीसाठी महाराष्ट्रातून चंद्रपूर, नागपुर,गडचिराेली, यवतमाळ मुंबई,ठाणे,नाशिक,मालेगाव,धुळे, नांदेड, परभणी येथून आलेले पुराेगामी पत्रकार संघातील पत्रकार बांधव, भगिनी हे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी सभागृहात राज्य कार्यध्यक्ष गोपाळ लाड राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, विदर्भ अध्यक्ष नरेंद्र साेनारकर, विदर्भ उपाध्यक्ष मिलिंद नरांजे, गडचिराेली जिल्हाध्यक्ष जगदिश कन्नाके, यवतमाळ जिल्हाप्रभारी माेरेश्वर ठाकरे, चंद्रपुर मनाेज माेडक, कपील भगत, अमाेल राऊत हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष रफिक सय्यद,शिक्षक चळवळ समितीच्या राज्याध्यक्षा शोभाताई नगराळे, अन्याय अत्याचार समितीच्या राज्याध्यक्षा कल्याणी धोंडगे, शिक्षक चळवळ समितीच्या राज्य उपाध्यक्ष प्रतिभा महिरे, शिक्षक चळवळ समितीचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र साळवे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष शेखर सोनवणे नाशिक जिल्हा संघटक प्रदीप देवरे ,उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब असोले,नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख सुखदेव खुर्दळ,अन्याय अत्याचार समितीच्या सुरेखा गांगुर्डे नांदेड कार्याध्यक्ष मारुती शिकारे हदगाव तालुका अध्यक्ष अवधूत खाडे, मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष प्रकाश कोल्हे,राजेंद्र वाराणसे,नीलकंठ जाधव, संतोष भोईर अल्ताफ पठाण रायगड जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते. राज्यभरातून पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या राज्यस्तरीय बैठकीचे संचालन राज्य सचिव निलेश ठाकरे यांनी केले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सचिव प्रविण परमार तथा राष्ट्रीय व राज्य पदधिकारी यांनी परिश्रम घेतले.