
♦ट्रकची कारला धडक;भद्रावती नजीक पतीचा मृत्यू
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
वणी-वरोरा रोडवरती भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक दिल्याने मारेगाव येथील तरुण महिला डॉक्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर महिला डॉक्टरच्या पतीला चंद्रपूर येथे उपचारा करीता नेत असताना वाटेत भद्रावती नजीक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २२ मार्च रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान घडली.
डॉ.अश्विनी गौरकार-झाडे (३१) असे मृतक महिला स्त्री रोग तज्ञ डॉक्टरचे नाव असून त्यांचे पती डॉ.अतुल गौरकार असे त्यांच्या पतीचे नाव आहे.डॉ.अतुल हे चंद्रपूर येथे कर्तव्यावर होते.
डॉक्टर दांपत्य आपल्या कार ने (क्र.एम.एच.३४ एक.एम.४२४०) नागपुरला काही वैयक्तिक कामा करिता जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र.एम.एच.३४ बी.झेड.२९९६) कारला धडक दिली.
ही धडक इतकी जबर होती की ट्रकने कारला चक्क शंभर ते दीडशे मीटर समोर ओढत नेले.यात महिला स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अश्विनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान जखमीला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे नेत असताना वाटेत भद्रावती नजीक त्यांचा मृत्यू झाला.ऐन उमेदीच्या भरात डॉक्टर दांपत्याच्या अशा अवेळी जाण्याने त्यांचा दीड वर्षाचा मूलगा पोरका झाला असून या दुर्दैवी घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.