
♦हिरकणी ढोल ताशा पथकाने वेधले लक्ष…
♦जागतिक महिला दिनाचे औचित्य…
∗लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
“मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप” तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतीक महिला दिना निमित्य शहरात ११ व १२ मार्च रोजी महिलांसाठी भरगच्च विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ११ मार्च रोजी आंबेडकर चौक येथून भव्य महिला सांस्कृतिक रॅली निघाली.यात महिलांचे भांगरा,आदिवासी नृत्य,लेझिम पथक, कराटे पथकासह मारेगावं चे खास आकर्षण असणारे “हिरकणी ढोल ताशा पथक”यात सामील झाले होते.
१२ मार्च रोज रविवारीला सायंकाळी ६ वाजता “मारेगाव मैत्री कट्टा गृप” तर्फे शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे एकल व सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात विविध महिला स्पर्धकांनी एकल व सामूहिक नृत्ये सादर केली. आकर्षक रोषणाईने सजलेल्या शेतकरी सुविधा केंद्रात शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.
“एकल नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रियंका घाने हिला मिळाला.द्वितीय पुरस्कार प्रियंका ढवळे व सोनल भांसे यांना देण्यात आला.राणी गाणार ही तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली.जयश्री कल्लेवार हिला प्रोत्साहन पुरस्कार मिळाला.समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार जय अंबे ग्रुप, द्वितीय शिव तांडव ग्रुप,तृतीय पुरस्कार शक्ती ग्रुप तर उतेजनार्थ पुरस्कार नारीशक्ती ग्रुप,मारेगांव यांना मिळाला.”
कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी मैत्री कट्टा ग्रुप चे दिपक जुनेजा,बिना हेपट(दुपारे),प्रतिभा डाखरे,उदय रायपूरे, किशोर पाटील,खालिद पटेल आदिनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास गणेश पावशेरे गजानन जयस्वाल,मिलिंद डोहने,सुनील भेले,शहाबुद्दीन अजानी,नर्गिस जिवानी, संजय साठे,दुष्यंत जैस्वाल,शैलजा ठानेकर,वनमाला आडकिने सह मंजुषा भगत आदी उपस्थित होते.