
— औचित्य संजय खाडे यांचा वाढदिवस
— संजय खाडे फाऊंडेशन चा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क: मारेगांव
वणी विधानसभा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील
धडाडीचे नेते, तथा कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार ता. २३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता वणी येथे शेतकरी मंदिर वसंत जिनिंग सभागृहात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिर तथा महा रक्तदान शिबिराचे संजय खाडे फाउंडेशनच्या पुढाकारातून आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी रक्तदानशिवाय पर्याय नाही. रक्तदानाच्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा घडावी ही उदात्त भावणा जोपासत संजय खाडे फाउंडेशन च्या पुढाकारातून, वणी विधानसभा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील धडाडीचे नेते, तथा कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार ता. २३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता वणी येथे शेतकरी मंदिर वसंत जिनिंग सभागृहात महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच शहरी तथा ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या यासाठी बचत गटाच्या महिलांना तसेच गृहउद्योग करणाऱ्या महिलांना उद्योग, कर्जवाटप, रोजगारांच्या विविध संधी याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ पांढरकवडा येथील गणेश आत्राम हे याच दिवशी मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा महिलांनी सुध्दा या कार्यक्रमास मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन संजय खाडे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदात्यांना आवाहन
अनेक भयंकर आजाराच्या शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया, अपघातग्रस्त, सिकलसेल यासारख्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असल्याने वणी उपविभागातील जनतेनी रक्तदान करुन सहकार्य करावे
संजय खाडे फाउंडेशन,
वणी.