
— सिंदी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
सिंदी (महागाव) येथील एका ३० वर्षीय अविवाहित युवकाने शेतात ता.२ एप्रिल रोजी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ५ वाजेदरम्यान उघडकीस आली.
राहुल गोविंदा काळे (३०) असे आत्महत्या केलेल्या अविवाहित युवकाचे नाव असून ते वडीलासबोत रा.सिंदी (महागाव) येथे वास्तव्यास होते. वडील गोविंदा काळे यांचे कडे १.६२ हेक्टर शेती असुन मृतक राहुल शेतीत काम करुन उदरनिर्वाहासाठी हातभार म्हणून मजुरीला जात होते.
दरम्यान ता २ एप्रिल रोजी सुध्दा मजुरीला जातो असे सांगून राहुल सकाळी ७ वाजता घरुन निघुन गेले. मात्र ५ वाजेदरम्यान राहुल हे शेतामध्ये मृतावस्थेत असल्याचे शेतात कामावर असणाऱ्यांच्या निदर्शनास आले. मृतका शेजारी मोनोसिल नामक विषारी औषध सुध्दा आढळून आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात नापोका राजु टेकाम व नापोका अजय वाभीटकर करीत आहे.
मारेगाव तालुका हा आदिवासीबहुल असुन शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शासन स्तरावरुन एकही उद्योग तालुक्यात नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण आहे. मागील काही दिवसापासून आत्महत्येचे प्रमाण कमी झाले असे वाटत असतानाच मात्र २९ एप्रिल व आता २ मे ह्या चारच दिवसात दोन आत्महत्या झाल्या. ही चिंताजनक बाब असल्याचे जनमानसात बोलल्या जात असुन उपाययोजनेची गरज आहे.