
– वणी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी येथील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख तसेच माजी नगरसेवक राजू तुराणकर यांचे धाकटे बंधू तोमदेव तुराणकर यांचे घरासमोर उभ्या बोलेरो गाडीला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना ३० एप्रिल रोजी रात्री अडीच वाजे दरम्यान घडली. सदर घटनेने शहरात पुरती खळबळ उडाली असून अज्ञात संशयिता विरुद्ध वणी पो.स्टे.ला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राजू तुराणकर यांचे धाकटे बंधू तोमदेव उर्फ बाळू तुराणकर यांनी आपली बोलेरो गाडी क्र.(एम.एच.३१सी.एस. ७९००) राजू तुराणकर यांना ता.२९ एप्रिल रोजी यवतमाळ येथे जाण्यासाठी दीली होती. यवतमाळ येथून रात्री उशिरा राजू तुराणकर वणी येथे परतले असता त्यांनी गाडी घरासमोर उभी केली होती.
दरम्यान ३० एप्रिल रोजी रात्री अडीच वाजे दरम्यान अज्ञान इसमाने सदर बोलेरो गाडीच्या काचा फोडत उभ्या गाडीला आग लावुन घटनास्थळावरून पोबारा केला.
सदर घटनेची तक्रार वणी पो.स्टे.ला दाखल करण्यात आली असून घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
राजू तुराणकर हे वणी येथील माजी शिवसेना शहर प्रमुख तसेच नगरसेवक होते.त्यांचा विविध सामाजिक संघटननांशी संबंध असुन ते काही सामाजिक संघटननांचे पदाधिकारी आहेत.