
– तालुक्यातील करणवाडी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील एका ४४ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून स्वतःची जीवन यात्रा संपविल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान उघडकीस आली.
सुधाकर मारुती वाघाडे (४४) रा.करणवाडी असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.सुधाकर हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
दरम्यान २० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजे दरम्यान गावातील बजरंग बली मंदिर परिसरात मृतक सुधाकर यांनी विष प्राशन केल्याचे गावातील नागरिकांच्या लक्षात आले.यावेळी नागरिकांनी ही बाब कुटुंबीयांना सांगितली.कुटुंबीयांनी तात्काळ सुधाकर यांना वणी येथील रुग्णालयात दाखल केले.परंतु उपचारादरम्यान सुधाकर यांची प्राणज्योत मालवली.
मृतक सुधाकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृतकाच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असल्याची माहिती आहे.