
– कर्करोगाशी झुंज अपयशी : पचारे कुटुंबावर शोककळा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील चिंचमंडळ येथील पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेले परसराम पचारे यांचे २५ जून रोजी सकाळी १०:३० वा. दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ४४ वर्ष होते.
परसराम पचारे हे गेल्या काही दिवसापासून अन्न नलिकेच्या कर्करोगाने ग्रस्त होते.त्यासाठी त्यांचेवर नियमित वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथे उपचार सुरू होता.
दरम्यान २५ जून रोजी सकाळी १०:३० वा.चिंचमंडळ येथील राहते घरी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचे अशा अवेळी एक्झिटने पचारे कुटुंबावर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत परसराम यांचे पश्चात आई,पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार असून आज दुपारी चार वाजता चिंचमंडळ येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.