
♦ मुलींच्या शासकीय वसतिगृहात रंगला आगळावेगळा सोहळा
♦ लोकशास्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आठ मार्च रोजी शहरातील शासकीय मुलींच्या वस्तीगृहात शहरातील जेष्ठ नागरिक अजय रायपुरे व वस्तीगृहाच्या गृहपाल बगडे यांच्या उपस्थित “तिच्या”कडे एक दिवसीय गृहपाल पदाचा पदभार सोपवून गौरव करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मारेगाव येथील मुलींच्या शासकीय वस्तीगृहात एका वेगळ्याच प्रकारे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.विभिन्न विभागामध्ये उच्च पदावर असलेल्या महिलांना नेहमीच “त्या” खुर्चीवर बसण्याचे सौभाग्य लाभते.ज्या विभागांमध्ये वरिष्ठ पदावर “पुरुषवर्ग” कार्यरत आहे त्या पदाचा एक दिवसीय पदभार महिलांना देऊन त्यांचा गौरव महिला जागतिक दिनानिमित्त नेहमीच केला जातो.या उक्तीला थोडीशी बगल देत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मुलींच्या शासकीय वस्तीगृहाच्या गृहपाल किशोरी बगडे यांनी आपल्या पदाचा एकदिवसीय पदभार कु.कोमल भोलेनाथ कोयचाडे वर्ग ११ वा(विज्ञान)सहाय्यक गृहपाल म्हणून कु. प्रीती अशोक पेन्दोर वर्ग ११ वा (कला)या विद्यार्थ्यींनींना शहरातील अजय रायपुरे तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व वस्तीगृहातील विद्यार्थिनींच्या समक्ष पुष्पगुच्छ देऊन गृहपाल पदाचा कार्यभार कसा हाताळला जातो…?याची माहिती देऊन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
या वेळी मारेगाव शहरातील अजय रायपुरे,सौ.बगडे तसेच सुरेंद्र सावसाकडे सह वसतीगृहातील असंख्य विद्यार्थिनीं उपस्थित होत्या.