
– महसुल विभाग ॲक्शन मोडवर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात अवैध रेती तस्करी जोमात सुरू असतानाच मारेगाव महसूल विभाग सुध्दा ॲक्शन मोडवर असून ता. १४ च्या मध्यरात्री १.३० वाजेदरम्यान रेती तस्करी व वाहतुक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर दापोरा शिवारात जप्तीची कारवाई करून अवैध रेती तस्करीवरीवर आपला फास अधिक घट्ट केला. या कारवाईने मात्र रेती तस्करांचे पुरते धाबे दनाणले आहे.
तालुक्यात मुबलक रेती असून गौणखनिज उत्खननही जोमात सुरू आहे. परिणामी रेती तस्करीने चांगलाच जोर धरला आहे. अगदी बिनधास्त दिवसाढवळ्या राजरोसपणे रेतीची अवैध चोरटी वाहतूक शहरासह तालुक्यात जोमात सुरू आहे.
दरम्यान ता. १४ शनिवारला गोपनीय माहितीच्या आधारे रात्री ८ वाजेपासून स्वतः तहसीलदार निलावाड व चमु दबा धरुन पाळत ठेवुन होती. सलग पाच तासानंतर मध्यरात्री १.३० वाजेदरम्यान चार ट्रॅक्टर येताना दिसताच दबा धरुन बसलेल्या चमुने समोर येत रेती भरलेले ट्रॅक्टर अडविले मात्र ट्रॅक्टर चालकांनी सुरु असलेल्या ट्रॅक्टर वरुन उड्या मारत पसार होण्यात यशस्वी झाले तर सर्वात मागे असलेल्या ट्रॅक्टर चालकाने जाग्यावरच रेती खाली करुन पसार झाल्याची माहीती आहे. लगेच पोलीस पथक सुध्दा बोलावण्यात आले.
अनिकेत कमलाकर झाडे, वैभव भास्कर सोनटक्के, शुभम भास्कर पालकर असे जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकांची नावे असून ट्रॅक्टर मारेगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.मात्र या तीनही ट्रॅक्टरला नंबरप्लेट नाही
सदर जप्तीची कारवाई मारेगाव येथील काही दिवसापूर्वीच रुजू झालेले तहसीलदार यु.एस.निलावाड, पो.उप निरीक्षक प्रमोद जिड्डेवार, नापोका अजय वाभीटकर, रजनिकांत पाटील, वाढवे, तलाठी सोयाम,पांडे, वाहन चालक विजय कनाके यांनी केली.