
– कुटुंबियांचे डोळे शासन मदतीकडे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गत काही दिवसापासून तालुक्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.संततधार पावसामुळे बळीराजा कमालीचा सुखावला आहे.परंतु हाच पाऊस कोपल्याने तालुक्यातील चिंचमंडळ येथे एका शेतमजुराचे घर कोसळल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली.सुदैवाने यात जिवीत हानी मात्र झाली नाही.घर कोसळलेल्या कुटुंबीयांचे डोळे आता शासन मदतीकडे टक लावून आहे.
यावर्षी जुलै महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने तालुक्यात ऑगस्ट महिन्यात पुरती विश्रांती घेतली.अख्खा ऑगस्ट महिना पावसाविना गेल्याने बळीराजा कमालीचा चिंतीत झाला होता.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने तालुक्यात चांगलाच जोर धरला.परिणामी शेतशिवारात उभ्या पिकांना नवसंजीवनी मिळाली व बळीराजासह सर्वसामान्यही सुखावले.गत काही दिवसापासून तालुक्यात पावसाची संततधार नॉन स्टॉप सुरू आहे.
दरम्यान ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान संततधार पावसामुळे तालुक्यातील चिंचमंडळ येथील शंकर रघुनाथ चौधरी यांचे घर कोसळले. यात जीवित हानी झाली नसली तरी घराचे प्रचंड नुकसान झाले आहे.ऐन पावसात घर कोसळल्याने चौधरी कुटुंबावर संकट ओढवले आहे.तूर्तास शंकर चौधरी यांचेसह त्यांचे कुटुंबीयांचे डोळे शासन मदतीकडे लागले आहे.