
♦लोकप्रीतीनीधींना पडलाय दिलेल्या शब्दाचा विसर
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील ग्रामिण भागाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे तर ग्रामीण भागातील काही रस्तेच दिसेनासे झाले आहे.ग्रामिण भागातील जनतेची नाळ तालुक्याला जोडली जावी यासाठी “गाव तेथे रस्ता” असे असताना ग्रामीण भागातील रस्ते या बाबीला अपवाद ठरत असल्याने ये-जा करणे दुरापास्त होई पर्यंतचा निष्काळजीपणा, नाकर्तेपणा राजकीय पुढाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे ग्रामीण भागातील मार्गाची दैनावस्था झाली आहे.
मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे.शेती आणि शेती आधारीत व्यवसायाशी तालुक्याची मुख्य नाळ जोडली आहे.तालुक्यात दोन जिल्हा परिषद सदस्य तर चार पंचायत समिती सदस्य संख्या आहे.५६ ग्रामपंचायती असुन शंभरावर गाव खेडी मिळुन मारेगाव तालुक्याची निर्मिती झाली आहे.
वणी विधानसभा मतदार संघात येत असलेला तालुका गेल्या कित्येक पंचवार्षिकमध्ये आश्वासनांचा खैरातीत पुढाऱ्यांनी जनतेच्या भावनेसी खेळ असल्याचे जेष्ठ जाणत्या व्यक्तीकडून सांगितल्या जाते आहे.मारेगाव तालुक्याचे ठीकाण असुन बसस्थानक नव्हते.प्रयत्न केल्यानंतर बस स्थानकाची जागा निश्चिती झाली असल्याचे बोलल्या जात असले तरी अजुनही बस स्थानकाच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही किंवा मुहूर्त मिळाला नाहीये.
तालुक्यात ग्रामीण भागातील एक दोन रस्ते वगळता तालुक्यातील बहुतांश रस्त्याची चाळणी झाल्याने सतत अपघाताची भीती बळावत आहे.त्यामुळे भयावह परस्थितीचा ग्रामीण भागातील जनता सामना करत आहे.तालुका स्थळी कार्यालयीन कार्यासाठी तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी यावे लागत आहे.रस्त्यांच्या द्यनीय अवस्थेमुळे बरेचदा विद्यार्थी वेळेवर शाळेत सुद्धा पोहोचू शकत नाही.गरोदर महिलांना रुग्णालयात आणताना अनेक अडचणी येत असल्याने कित्येकदा रस्त्यातच बाळंतपण झाल्याचे वास्तव आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘मी’ पणाचा आव आणणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या उघड्या डोळ्यात धुळ टाकल्या सारखे झाले आहे.अनेक गावातील जनतेकडून तहसिल कार्यालयात निवेदन दिली जात आहे.रस्त्याच्या समस्येचा पाढा वाचल्या जात असुन होत असलेला त्रास त्यात नमुद केलेला असतो.लोकप्रतिनिधीनीं या बाबीवर लक्ष दिले पाहिजे अशी माफक अपेक्षा असली तरी जनतेच्या हिताची,प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असल्या शिवाय नुसताच पुढारपणा कुचकामी ठरेल.