
– खुराणा यांनी दिला माणुसकीचा प्रत्यय
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव नगरपंचायत इमारतीच्या पायरीवर ता .१४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान एका ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला.महीलेची ओळख पटत नसल्याची माहिती प्राप्त होताच ज.क.सं.सं.अध्यक्ष गौरीशंकर खुराणा आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह अत्यंत बिकट स्थितीत असतानाही त्यांनी मृतदेहाची पाहनी करुन मृतक महिलेबाबत माहिती शोधायला सुरुवात केली.अखेर मृतक महीला ही नकोडा (चंद्रपूर)येथील असुन महिलेच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती प्राप्त होताच खुराणा यांनी मृतक महिलेच्या अंतिम संस्कारास यथाशक्ती मदत करण्याचा निर्णय घेऊन माणुसकीचा प्रत्यय दिला.
ता.१४ ऑक्टोंबर रोजी शहरातील नगरपंचायत इमारतीच्या पायरीवर एक ६५ वर्षीय (अंदाजे ) महीला मृतावस्थेत आढळून आली. सदर महिला गत ५-७ दिवसापासून शहरात असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितली.
घटनेची माहिती प्राप्त होताच मारेगाव पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. परंतु मृतक महिलेची ओळख पटत नव्हती.घटनेची माहिती प्राप्त होताच जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतक महिलेच्या मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट असतानाही त्यांनी मृतक महिलेबाबत माहिती शोधायला सुरुवात केली.सदर महिलेचा मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा व कार्यकर्त्यांनी स्वतः स्ट्रेचरवर घेऊन गेले.
दरम्यान काही वेळातच मृतक महिलेची ओळख पटली.मृतक महिला ही नकोडा (चंद्रपूर)येथील असून मृतक महिलेच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची बाब जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांना कळताच त्यांनी मृतक महिलेच्या अंतिम संस्कारास होईल ती मदत करण्याचा निर्णय घेत माणुसकीचा प्रत्यय दिला. जनहित कल्याण संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा मृतक महिलेच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचेसह राॅयल सय्यद, हर्षद शेख, अल्ताफ कुरेशी, सरफराज कुरेशी आदी उपस्थित होते.