
– शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर
– मारेगाव शिक्षण वर्तुळात गोंधळाची स्थिती
– गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती गठीत
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल ठाकरे : मारेगाव
बीईओ-कास्ट्राईबचे वादाने आता चांगलेच रौद्ररूप धारण केले आहे. एकीकडे कास्ट्राईब संघटनेने नरेंद्र कांडूर यांचेवर द्वेशपुर्ण वागणुकीचे आरोप केले असतानाच दुसरीकडे प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक संघटना बीईओंचे समर्थनार्थ सरसावल्या होत्या. यात शिक्षक संघटनेने बिईओंचे समर्थनार्थ बाजू मांडल्याने मारेगाव शिक्षण वर्तुळात नेमके चाललेय काय…? हे न उमगन्या पलिकडील कोडे होऊन बसले आहे.
येथील गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या द्वेषपूर्ण वागणुकी विरोधात कास्ट्राईब संघटनेने ३ जुलै रोजी धरणे आंदोलन केले. बीईओंचे चौकशी करिता त्रिस्तरीय समिती गठित करण्यात आल्याने या आंदोलनाचे फलित त्यांना मिळाले.
परंतु आरोप प्रत्यारोपाची शृंखला सुरू असताना बिईओंचे समर्थनार्थ मुख्याध्यापक संघटना सरसवली.यात आता शिक्षक संघटनेने ही दंड थोपाटले असून गटशिक्षणाधिकाऱ्यांवरील ते आरोप तथ्यहीन असल्याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.
संघटनेत विविध जाती-जमातींचे शिक्षक बांधव कार्यरत आहे.परंतु नरेंद्र कांडुरवार यांनी आम्हास कधीही द्वेषपूर्ण वागणूक दिली असे वाटले नाही. मारेगाव पंचायत समितीतील शिक्षण वर्तुळातील वातावरण अतिशय सलोख्याचे असून कास्ट्राईब संघटनेने बिइओं वरती केलेल्या आरोपांबाबत आम्ही सहमत नाही असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक शिक्षक पुरस्कार प्राप्त हेमराज कळंबे यांचेसह संजय फुलबांधे,संजय आत्राम, गणेश भोयर ,ईश्वर वडस्कर, प्रवीण लोंढे, सुरेश आत्राम ,संतोष ठाकरे, अमर देवाळकर ,बाबाराव ढवस, रविकांत मडावी यांचेसह शेकडो शिक्षकांचा जत्था उपस्थित होता.
कास्ट्राईबच्या धरणे आंदोलनाचे फलित..!
दरम्यान शिक्षण विभागात बिइओं कडुन कर्मचाऱ्यांस मिळत असलेल्या द्वेषपूर्ण वागणुकी करिता कास्ट्राईब शिक्षक संघटनेने ३ जुलै रोजी धरणे आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत प्रभारी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांचे चौकशी करिता त्रिस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.परिणामी शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
एकाच दिवशी तालुक्यातील दोन शाळांनी शिक्षक मागणी करीता पंचायत समितीवर धडक दिली. सेवापूर्ती कार्यकाळ संपण्यास अवघा महिना शिल्लक असताना गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांचेवर द्वेशपुर्ण वागणुकीचा आरोप करण्यात आल्याने हे कोडे दिसते तितके सोपे नसल्याचे अधोरेखित झाले आहे.परिणामी शिक्षण वर्तुळातील अनागोंदी बाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.