
– दुचाकी-ट्रॅव्हल्स अपघात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील अहफाज जिनींग नजीक भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून धडक दिल्याने तालुक्यातील करणवाडी येथील दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाल्याची घटना १७ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेदरम्यान घडली होती.
यात भूषण संजय ढेंगळे (१९) रा.करणवाडी हा दुचाकीस्वार युवक डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता.त्याच्या कानातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. १७ एप्रिल रोजी जखमी भूषणला मारेगाव येथुन वणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते.
दरम्यान १८ एप्रिल रोजी प्रकृती चिंताजनक असल्याने भूषणला वणी येथून नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात हलविले असता नागपूर येथील रुग्णालयात उपचारानंतर भूषणला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितली.