
– मारेगाव तालुक्यातील घटना
– नागरिकांत कमालीची दहशत
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
१ ऑक्टोबर रोजी बोटोनी जंगल जंगल परिसरात वाघाने गायीवर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असतानाच ता.३ ऑक्टोबर रोजी येथीलच चांद सुरवा भागात वाघाने गाईचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरातील नागरिकांत वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे.
बोटोनी जंगल परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर हा नेहमीचाच आहे.अधून मधून या परिसरात वाघोबाचे दर्शन परिसरातील नागरिकांना नित्याचेच झाले आहे. परंतु पशुधनाला चराईकरिता याच परिसरात न्यावे लागत असल्याने स्थानिक नागरिकांचाही नाईलाज आहे.
दरम्यान ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान गुराखी अरुण नागोसे हे गुरांना चरण्यासाठी बोटोनी परिसरातील चांद सुरला जंगल परिसरात घेऊन गेले असता घनदाट झुडपाच्या आडोशाला दडी मारून बसलेल्या वाघोबाने गाईवर अचानक जीवघेणा हल्ला करुन गाईचा फडशा पाडला.
कमल कवडु नेहारे असे संबंधित पशुधन मालक महिलेचे नाव आहे.
तूर्तास आपले पशुधन गमविलेल्या कमल यांचेवर आर्थिक संकट कोसळले असून शासन मदतीकडे त्यांचे डोळे लागले आहे.