
– राज्य महामार्गावरील मांगरूळ येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील मांगरूळ नजीक दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाल्याने दुचाकीस्वार एक युवक घटनास्थळीच ठार तर दुचाकीवरील इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजे दरम्यान घडली.
हितेश संजय पारखी (२५) रा.मदनापुर असे अपघातात घटनास्थळीस ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.हितेश हे भद्रावती येथे डब्ल्यूसीएल कंपनीत काम करत होते.
मोहन म्हसगवळी (५५) व त्यांचा मित्र राघोबा कोरझरे (४५) रा.मांगरुळ अशी अपघातात जखमी झालेल्या ईतर दोन व्यक्तींची नावे आहेत.
दरम्यान ता .२६ ऑक्टोबर हितेश हे भद्रावती येथून आपले कर्तव्य संपवून मदनापूर येथील स्वगृही परत येत होते.वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील मांगरूळ नजीक रात्री ८ वाजेदरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुसऱ्या दुचाकीने हितेश यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या धडकेत हितेश यांच्या डोक्याला जबर मार लागला.यात हितेश जागीच गतप्राण झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले.
रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी जखमींना प्राथमिक उपचाराकरिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तूर्तास दोन्ही जखमींना पुढील उपचारार्थ चंद्रपूर व वणी येथे हलविल्याची माहिती आहे.