
– शेकडो चिमुकल्यांचा सहभाग
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
‘तान्हा पोळा उत्सव समितीच्या’ वतीने आयोजित तान्हा पोळ्याचा कार्यक्रम ओम नगर,चिखलगाव येथे घेण्यात आला.यात नंदी सजावट स्पर्धा, वेशभूषा स्पर्धाा यांसारख्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व प्रोत्साहनपर बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षक प्रा. बाळासाहेब राजूरकर आणि प्रा. नितीन मोहीतकर होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ताजी पांडे तर प्रमुख पाहूणे जाकिर भाई शेख व नायब तहसीलदार मा. रामगुंडे साहेब होते.
या स्पर्धेत ४२ बालकांनी सहभाग नोंदवला. या नंदी सजावट स्पर्धेमध्येन प्रथम क्रमांक राघव ठेंगणे, द्वितीय क्रमांक हेल्पीक तळवळकर, तृतीय क्रमांक जितेन निमकर तर प्रोत्साहनपर बक्षिस ऋतूराज चौधरी यांना मिळाले. त्याचबरोबर वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक रिद्धी तपासे, व्दितीय क्रमांक रागीनी गावंडे, तृतीय क्रमांक मानस मांडवकर तर प्रोत्साहनपर बक्षिस रिदिमा डाकरे यांना मिळाले.
सर्व सहभागी स्पर्धकांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी ओम नगर परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी नागरिकांचे सहकार्य लाभले.