
– राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील वरुड येथील एका युवकाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना ता.२८ मार्च रोजी दुपारी उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.
गजानन रामचंद्र जगताप (३२) रा.वरुड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन दुपारी घरी कोणी नसताना त्यांनी २८ मार्च रोजी दुपारी त्यांच्या वरुड येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
गजानन यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.