
– १७ वर्षीय मुलींचा संघ कबड्डीत विजयी
– जिल्हास्तरावर कूच
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील नवरगाव येथील पंचशील विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यात १७ वर्षीय मुलींच्या कबड्डीत मारेगावातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या चमुने चमक दाखवित अंतिम सामन्यात विजय मिळवत जिल्हास्तरावर कूच केली आहे.
ज्ञानाचे धडे गिरवण्यासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या अनुषंगाने दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.या छोटेखानी स्पर्धांतून उद्याचे भावी खेळाडू तयार करणे हा उद्देश असतो.
दरम्यान ता.२० सप्टेंबर पासून मारेगाव तालुक्यातील पंचशील विद्यालय, नवरगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांची थाटात सुरुवात झाली होती.यात १४ वर्ष,१७ वर्ष व १९ वर्षाखालील मुला-मुलींचे कबड्डीचे सामने झाले.यात १७ वर्षाखालील मुलींतुन मारेगावातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या चमुने चमक दाखवीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा काबीज केली.
परिणामी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा मुलींचा कबड्डी संघ आता जिल्हास्तरावर धडक देणार असून सावित्रीच्या लेकींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.