
– अल्पसंख्यांक सेलचे तहसीलदारांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मणिपूर येथील अमानवीय घटनेने अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळत असतानाच ता .२५ जुलै येथील काँग्रेस अल्पसंख्यांक सेल चे तालुकाध्यक्ष शाहरुख शेख यांचे नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यात मणिपूर येथील कलंकित घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मणिपुर येथे दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशात प्रचंड खळबळ उडाली आहे.परिणामी या अमानवीय घटनेने पडसाद अवघ्या देशभर उमटतानाचे चित्र सर्वदुर दिसून येते आहे.
दरम्यान २५ जुलै रोजी येथील काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शाहरुख शेख यांचे नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यात मणिपूर येथील कृर घटना अत्यंत लज्जास्पद असून या घटनेतील दोशींवर कठोर कारवाई करून येथील मुख्यमंत्र्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आरोग्य सभापती खालीद पटेल,नगरसेविका थारांगणा खालीद पटेल, काँग्रेसचे गौरीशंकर खुराणा, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शाहरुख शेख, शहरी व काँग्रेसचे अध्यक्ष समीर सय्यद, अतिक शेख,मो.आतीफ मो.शाबीर, मदार कुरेशी, आरिफ शेख इस्माईल, शेख साजिद शेख रजाक आदी उपस्थित होते.