
– ५५ धान्य कीटचे वाटप
– मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गत काही दिवसापासून तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला. परिणामी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे.याची प्रचंड झळ मार्डी परिसराला बसली आहे. येथील काही घरात पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहे .परिणामी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीने पुढाकार घेत २८ जुलै रोजी मार्डी येथील गरजुंना धान्य कीटचे वाटप करुन माणुसकीचा परिचय दिला.
तालुक्यात सुरू असलेली संततधार निवळली असली तरी त्याची दाहकता अजूनही कायम आहे.तालुक्यातील मार्डी, चिंचमंडळ, दापोरा,कुंभा, परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते.परिणामी मार्डी येथील काही घरात नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने याची प्रचंड झळ येथील रहिवाशांना बसली होती.
दरम्यान २८ जुलै रोजी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीने पुढाकार घेत मार्डी येथील गरजूंना धान्य कीटचे वाटप केले.यात ५ किलो तांदूळ,५ किलो पीठ, तेल,तिखट, साखर,हळद, मीठ ई. इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.यावेळी ५५ कुटुंबांना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मारुती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरी शंकर खुराना, सरपंच रवीराज (बंडु भाऊ) चंदनखेडे, नगरसेवक व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश बदकी,सुरेश चांगले, अंकुश माफुर, रॉयल सय्यद, प्रफुल्ल विखनकर,सागर लोणारे ,युनुस शेख, अतुल बोबडे, संतोष थेरे, सुरेश पंडीले ,गौरव आसेकर,धिरज डांगाले, यांचेसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते तसेच मार्डी येथील नागरिक उपस्थित होते.