
— पो.नि.संजय साळूंखे यांचे आवाहन
— अन्यथा वाहणांचा लिलाव करण्यात येईल.
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव……
मागील अनेक दिवसापासुन पोलीस स्टेशन येथे बेवारस स्थिती मध्ये असलेली वाहणे जप्त करून मारेगांव पोलीस स्टेशन ला असून वाहनाच्या मूळ मालकांनी त्यांचा मालकी हक्क सादर करुन वाहनाचे कागदपत्र,तथा आधारकार्ड ७ दिवसाचे आत सादर करुन आपले वाहन परत घेवून जावे. दिलेल्या कालावधीत जर कागदपत्रे सादर केली नाही तर शासकीय नियमा नुसार लीलाव करुन लिलावाची रक्कम शासन जमा करण्यात येईल असे पत्रक काढून पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी आवाहन केले आहे.
मारेगांव पोलीस स्टेशन येथे बरेच दिवसापासुन बेवारस असलेल्या १४ वाहनाचा लिलाव प्रस्तावित असून ती वाहणे येणेप्रमाणे.
१) यामाहा कंपनीची काळया रंगाची दुचाकी एम एच २४ जे २०१९
२)हीरोहोंडा स्ट्रीट स्मार्ट कंपनीची काळ्या रंगाची एम एच २९ एच८९९३
३) कावासाकी बॉक्सर कंपनीची काळ्या रंगाची एम एच२९ जे ३३७८
४) के बजाज रंग लाल एम एच २६ यु ९५११
५) के बजाज रंग काळा एम एच २९ एल ३७४७
६) होंडा शाईन रंग कथ्था एम एच ३४ बीड एन ३३७८
७) के डिस्कव्हर रंग काळा निळा पट्टा एम एच २९एक्स ४०४९
८) बजाज एव्हेंजर रंग निळा एम एच २९ ए व्ही ८६७९
९) हीरोहोंडा रंग काळा भगवा पट्टा विना क्रमांकांची दुचाकी ०२१.२०एफ ५०१४१
१०)होन्डा शाईन रंग ग्रे विना नंबर ३६६एन८८१८७२५८जेसी३६इ९३०४७३७
११) हिरो स्प्लेंडर प्रो रंग काळा रंगाची एम एच२९ ए जी ५१२१
१२) पल्सर रंग काळा एम एच ३१ डी पी ७३२४
१३)चारचाकी ईडीका डीएलएस रंग पांढरा एम एच ३१ एजी ३२४७
१४)ऑटो रंग काळा नंबर नसलेला डीएचजीबीयुबी १६८८१
एक चार चाकी व एक ऑटो सह १२ दुचाकी असे एकुण १४ वाहने मारेगांव पोलीस स्टेशनला मागील अनेक दिवसापासुन बेवारस स्थीती मध्ये पडुन आहे.या वाहनाच्या मुळ मालकांनी त्याच्या वाहनाच्या मालकासह मुळ कागदत्र ७ दिवसाचे आत पोलीस स्टेशनला येवून आपली मालकी सिध्द करून वाहन घेवून जावे अन्यथा वरील वाहनाचा (प्रस्तावित) लिलाव शासकीय पध्दतीने करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी प्रसिद्धी पत्रक काढून आवाहन केले आहे.