
– वैयक्तिक खेळात नेत्रदीपक कामगिरी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील नवरगाव येथील पंचशील विद्यालयात नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा थाटात पार पडल्या. यात मारेगावातील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक खेळात नेत्रदीपक कामगिरी केली.परिणामी येथील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांकरिता निवड झाली असून विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत.
ज्ञानाचे धडे गिरवण्यासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या अनुषंगाने दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.या छोटेखानी स्पर्धांतून उद्याचे भावी खेळाडू तयार करणे हा उद्देश असतो.यात सांघिक खेळांव्यतीरीक्त वैयक्तिक खेळांचाही समावेश असतो.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्रामुख्याने भालाफेक,गोळा फेक, उंच उडी,लांब उडी व धावणे आदी खेळांचा समावेश असतो.
दरम्यान तालुक्यातील नवरगाव येथील पंचशील विद्यालयात नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.यात वैयक्तीक क्रीडा स्पर्धांत मारेगावातील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.परिणामी येथील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांकरिता निवड झाली असून सर्व विद्यार्थी कौतुकास पात्र आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्यांसह येथील शिक्षकांना दिले आहे.