
– मारेगाव तालुका शिवसेनेचे (उबाठा)वणी आगार प्रमुखांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील मार्डी परिसरातून मारेगावात शिक्षणाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.परिणामी मार्डी परिसरातील विद्यार्थी व नागरिकांकरिता मार्डी- मारेगाव बस सेवा नियमित सुरू करा अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे (उ.बा.ठा.) माजी आमदार,विद्यमान जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांचे मार्गदर्शनात व शिवसेनेचे (उ.बा.ठा.) मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी यांचे नेतृत्वात वणी आगार व्यवस्थापकांना देण्यात आले.
गत काही दिवसाआधी तालुक्यातील मार्डी येथून दहा ते बारा शालेय विद्यार्थी घेऊन येणारा ऑटो पिसगाव येथील पांढरकवडा (लहान) फाट्याजवळ पलटी होऊन केगाव येथील अनिकेत नामक विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला होता.ठिकठिकाणी झिंगलेला रस्ता, अवैध प्रवासी वाहतूक व परिवहन मंडळाची अनास्था यामुळेच अनिकेतला आपला जीव गमावावा लागला.या घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले होते.
दरम्यान २ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे (उ.बा.ठा.) माजी आमदार,विद्यमान जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात व शिवसेनेचे मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी यांचे नेतृत्वात वणी आगर प्रमुखांना निवेदन देण्यात आले.
यात तालुक्यातील मार्डी परिसरातून शिक्षणाकरिता मारेगावात येणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच कार्यालयीन कामकाजाकरिता मारेगावात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने सदर मार्गावरून नियमित बस सेवा सुरू करण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे (उबाठा) मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी, मारेगाव नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जीवन काळे, संजय टोंगे, गजू आडे, अनंत आसेकर, मारुती क्षीरसागर, युवा सेना जिल्हा समन्वयक समीर लेनगुळे, करण किंगरे, ऋतुजा ठावरी, रिता आडे,युवा सेना तालुकाप्रमुख मयुर ठाकरे, वैभव डुकरे, युवा सेना शहर प्रमुख गणेश आसुटकर आदी उपस्थित होते.