
– कु.वैशाली प्रथम,कु.जयश्री द्वितीय तर कु.हमीरा तृतीय
– विद्यालयाचा निकाल ८८.२३ टक्के
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नुकताच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. यात वणी तालुक्यातील मंदर येथील कै. गिरजाबाई माध्यमिक विद्यालयतुन प्रथम तीनही क्रमांकावर कन्यारत्न झळकले असून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.विद्यालयाचा निकाल हा ८८.२३% लागला असून येथील सावित्रीच्या लेकींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कै. गिरजाबाई माध्यमिक विद्यालय मंदिर येथुन एकूण ३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.पैकी ४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत,१५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत झळकले.
विद्यालयातून कु. वैशाली बिजाराम हेपट ही विद्यार्थिनी ८५% गुण घेऊन प्रथम,कु. जयश्री गजानन परसूटकर ही ८१.८०% गुण घेऊन द्वितीय, तर कु. हमीरा मोहम्मद आबीद ही ७७% गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
या व्यतिरिक्त कु. गायत्री वासुदेव खेडेकर हि ७६.२०% ,कु. सलोनी देविदास झिले हि ७४.४०%, कु.मानसी मोहन धाबेकर हि ७४.२०% व आयुष बंडू झाडे हा विद्यार्थी ७०% गुण घेत प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाला. सावित्रीच्या लेकींच्या वर्चस्वात विद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा यावर्षी देखील उत्तमरित्या कायम राखली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक हेमंत ताजने, मुख्याध्यापक ए. एम. निब्रड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समस्त पालक यांचेकडून कौतुक होत आहे.