
– दैदिप्यमान मिरवणुकीचे आयोजन
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
दुर्जनांचा नाश करून कुशल प्रशासनाचा आदर्श निर्माण करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या जन्मदिनानिमित्त शहरात ३० मार्च रोजी सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.या दैदिप्यमान मिरवणुकीत श्रीरामांच्या जयघोषाने समग्र मारेगाव नगरी दुमदुमली.
बजरंग दल, मारेगाव यांच्या पुढाकाराने ३० मार्च रोजी शहरात श्रीरामनवमी निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.ही दैदिप्यमान मिरवणूक शहरातील जुने हनुमान मंदीर, नगर पंचायत प्रांगणातून सुरु होऊन मार्डी चौकातून सदगुरु जगन्नाथ बाबा मंदीर होत परत यवतमाळ रोड वरील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक व जुन्या गावातील मज्जीद रोड ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकातून जात शेवटी न.पं.च्या प्रांगणात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
मिरवणुकीच्या यशस्वीते करिता बजरंग दलाचे सदस्य तसेच शहरातील नागरिकांचे सहकार्य लाभले.
मिरवणुकी दरम्यान समाजकंटकां कडुन काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण मिरवणुकी दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात दिसून आला.